sarv awashyak kagdptranchi yadi – शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासत असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, तसेच माणसांना दैनंदिन जीवनात विविध शासकीय दाखले लागतात या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये लागणारे सर्व शासकीय दाखले तयार करताना लागणारे कागदपत्रे याची माहिती बघणार आहोत.
sarv awashyak kagdptranchi yadi
List of all required documents for maharashtra government marathi
shasakiy kamasathi kagadpatre
Cast Certificate Document
जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
- शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर बोनाफाईड
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
- पंजोबा, आजोबा, चु.आजोबा, चुलते, आत्त्या, यापैकी एक सन १९५० (एससी ), १९६१ ( एनटी ), १९६७( ओबीसी ) पूर्वीचा शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आयडेंटी साइज फोटो
- तलाठी / ग्रामसेवक / सरपंच यांचा रहिवासी दाखला
income certificate documents
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
- तलाठी उत्त्पन्न दाखला / अहवाल
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आयडेंटी साइज फोटो
domicile certificate documents
डोमासाईल नॅशनॅलीटी दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
- स्वताचा शाळेचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आयडेंटी साइज फोटो
non creamy layer certificate documents
नॉन क्रिमिलेयर काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
- स्वताचा शाळेचा दाखला
- जातीचा दाखला
- तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला 3 वर्षाचा उत्त्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आयडेंटी साइज फोटो
documents required for ews certificate
EWS प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- रेशन कार्ड
- आधार कार्ड / मतदान कार्ड
- फोटो
- उत्पन्न दाखल
- शाळा सोडल्याचा दाखल ( स्वतःचा )
- १०० रु स्टॅम्पवरती लाभ न घेतल्याचे शपथपत्र
shetkari dakhla documents
शेतकरी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- शेतकरी असल्याचा तलाठो दाखला
- ७ / ९२ खाते उतारा
- १००/- रू.च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तहसिदार सही व शिक्का
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- फोटो
janm nond adesh documents
जन्म नोंद आदेश काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- ग्रामसेवक यांचा नाव नोंद नसलेचा दाखला
- लसीकरण कार्ड किंवा शा.दा. जन्म झालेला पुरावा
- १००/- रू. च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तहसिदार सही व शिक्का
- मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- फोटो
mrutyu nond adesh documents
मृत्यू नोंद आदेश काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- ग्रामसेवक यांचा मृत्यू नोंद नसलेचा दाखला
- १००/- रू. च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तहसिदार सही व शिक्का
- मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट
- API रिपोर्ट
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- फोटो
jeshth nagrik dakhala documents
जेष्ठ नागरिक दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म नोंद नसलेचा दाखला किंवा जन्माचा योग्य पुरावा
- तलाठी रहिवाशी दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- फोटो
shet majur dakhla documents
शेत-मजूर दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- ज्याचे शेतात काम करता त्याचा ७ / १२ खाते उतारा
- ज्याचे शेतात काम करता त्याचा पगाराचा वार्षिक दाखला
- भूमिहीन असल्यास तलाठी दाखला
- मुलाचा शाळेचा दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
ration card documents
नवीन रेशनकार्ड / शिधापत्रिका काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- आर.एस.बी.वाय कार्ड
- ७ / १२ आणि ८अ चा उतारा
- वीज बिल
- टॅक्स पावती झेरॉक्स
- वयाचा पुरावा (खालील पैकी किमान एक)
- जन्माचा दाखला
- प्रार्थामक शाळेचा प्रवेशाचा उतारा
ration card var nav add karayche documents
रेशन कार्ड वर नाव वाढविन्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
1. मुलांची नावे वाढवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- जन्म दाखला किंवा बोनाफाईट
- आधारकार्ड झेरॉक्स
- स्वताचे रेशन कार्ड
2. पत्नीचे नाव वाढवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- विवाह नोंद दाखला व जुन्या रेशन कार्ड मधील नाव कमी केल्याचा दाखला ( पत्नी तालुक्याच्या बाहेरची असेल तर नाव कमी केलेलेचा तहसीलदार यांचा दाखला )
- आधार कार्ड झेरॉक्स व स्वताचे रेशन कार्ड
ration card var navkami karane documents
रेशनकार्ड वरील नाव कमी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
- रेशन दुकानदार व तलाठी यांचा नाव कमी केलेला दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- 1 फोटो
cast validity document
जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- पंजोबा, आजोबा, चु.आजोबा, चुलते, आत्त्या, यापैकी एक सन १९५० (एससी ), १९६१ ( एनटी ), १९६७ ( ओबीसी ) पूर्वीचा शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला.
- नमूना 17 व नमूना 3 आणि वंशावळ यांचे अफेडेविट
- शाळा / विद्यालय प्राचार्य यांचेकडून शिफारस पत्र ( फॉर्म नं. 15 )
- सीईटी दिली असेल तर अप्लिकेशन फॉर्म .
- जातीचा दाखला काढताना दिलेले सर्व कागदपत्रे
- अर्जदारचा पासपोर्टसाइज फोटो
- आधारकार्ड
- सही
pan card document
पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- दोन आयडेंटी साइज फोटो
shop act document
शॉप ऍक्ट लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दुकानाचा नावाच्या बोर्डसहित दुकानाचा फोटो
- आयडेंटी साइज फोटो
- व्यावसायाचे नाव व व्यवसायाचा पत्ता
- कामगार संख्या
- सहीचा नमुना
- ई मेल आयडी
udyam registration document
उद्यम आधार काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- जी एस टी नंबर ( असलेस )
- मोबाईल नंबर / ई मेल
- बँक पासबुक झेरॉक्स
food licence document
फूड लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- पत्याचा पुरावा ( लाईट बिल किंवा भाडे करार )
udid card document
स्वावलंबन कार्ड – UDID काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सहीचा नमुना
- अपंगाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
e shram card document
ई- श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सक्रिय मोबाईल नंबर
pradhanmantri ujjwala gas yojana documents
प्रधान मंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड ( नसेल तर स्वयंघोषणापत्र )
passport documents
पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- जन्म दाखला
- शाळेचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- फोटो
life certificate documents
हयातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पी.पी.ओ नंबर
- मोबाईल नंबर
voter id card documents required / matdan card documents
मतदान काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड / पॅन कार्ड ( कोणतेही एक )
- पासपोर्ट साईझ फोटो
- रेशन कार्ड / लाईट बिल / ड्रायविंग लायसन्स ( कोणतेही एक )
driving licence documents
ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- सहीचा नमुना
- सक्रिय मोबाईल नंबर / ई मेल
bandhkam kamgar documents
बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड ( पूर्ण जन्म तारीख असणे आवश्यक )
- रेशन कार्ड ( आर सी नंबर असणे आवश्यक )
- बँक पासबुक
- ३ पासपोर्ट साईझ फोटो
- वारसाचे आधार कार्ड
- ९० दिवस काम केलेले प्रमाणपत्र
fastag documents
फास्टॅग काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आर सी बुक
- आधार कार्ड / पॅनकार्ड
- ड्रायविंग लायसन्स
- पासपोर्ट साईझ फोटो ( मालकाचा )
marriage certificate documents
विवाह नोंद दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- वधू व वरच्या आधार कार्ड झेरॉक्स
- लग्नाची पत्रिका
- वधू – वराचे ५ पासपोर्ट साईझ फोटो
- वधू वर यांच्या लग्नाचे ३ फोटो
- वधू – वराचे शाळेचे दाखले
- वधू – वराचे वडिलांकडील रेशनकार्ड
- साक्षीदार आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईझ फोटो ( प्रत्येकी २ )
- वधू व H.I.V वर रिपोर्ट
- १०० रु च्या स्टॅम्पवरती विवाह नोंदणी
Conclusion :
sarv awashyak kagdptranchi yadi – शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासत असते. आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शासकीय दाखले तयार करताना लागणारे कागदपत्रे याची माहिती बघितली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…