PMEGP Yojana 2024 – पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना : देशातील तरुण बेरोजगारांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे . पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹ 10 ते ₹ 25 लाखांपर्यंतची कर्जस्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या अंतर्गत आपण आपला व्यवसाय सुरू करू शकता. योजनेबद्दल थोडक्यात माहिती, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, योजनेचे फायदे, सब्सिडी किती मिळणार,अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहे.
PMEGP Yojana Marathi
pmegp loan scheme
Prime Minister Employment Generation Programme (PMEGP) is the loan scheme offered to give financial help to small scale and medium scale busineses. It is a loan scheme suitable for those who want to open a new business. Let us Know about Eligibility Criteria, Terms and Conditions, Required Documents List, and Online Application Form and Registration Process in Marathi.
pmegp yojana in marathi
योजना | PMEGP Yojana |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
चालु वर्ष | 2024 |
लाभार्थीं | देशातील बेरोजगार तरुण |
उद्देश | स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अधिकाधिक व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
PMEGP Yojana Loan Subsidy Yojana 2024 in Marathi New Loan Subsidy Scheme, How To Apply, Key Points, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, How To Register ? Official Website, PMEGP Yojana, pmegp loan scheme.
pmegp scheme information in marathi
PMEGP योजनेबद्दल थोडक्यात माहिती
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP) ही योजना 2008 पासून अमलात आली आहे, ही योजना केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राबविण्यात येते. या योजनेद्वारे आपला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय उभारण्यासाठी पात्र अर्जदारास रुपये २५ लाख पर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेतील कर्जावर 15 % ते 35% सब्सिडी देण्यात येते. या योजनेचा लाभ देशातील बेरोजगार युवांना देण्यात येतो. या योजनेच्या अंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना आपला स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 ते 25 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. PMEGP योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारांना दिला जातो. या योजनेच्या अंतर्गत आपण आपला व्यवसाय उद्योगाची निर्मिती करू शकता.
pmegp yojana eligibility
PMEGP योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार भारतातील रहिवाशी असावा.
- अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदार कमीत कमी 8 वी उत्तीर्ण असावा.
- अर्जदाराला पहिल्यापासून कोणती सब्सिडी मिळत असेल तर तो अर्जदार या योजनेस पात्र ठरत नाही.
- एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरते.
pmegp scheme benefits
PMEGP योजनेचे फायदे काय आहेत ?
- बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात.
- तरुणांना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचा कर्ज आणि अनुदान दिले जाते.
- अर्जदाराच्या श्रेणी आणि स्थानानुसार तरुणांना व्यवसायाच्या खर्चाच्या 15% ते 35% पर्यंतची सब्सिडी दिली आहे,
- तरुणांना व्यवसायाच्या खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज बँकेतून दिले जाते, ज्याच्यावर 8% ते 11% पर्यंतचा व्याज दर आकारण्यात येतो.
- तरुणांना व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आणि नंतर प्रशिक्षण दिले जाते.
pmegp loan business list
PMEGP योजनेअंतर्गत कोणते उद्योग येतात ?
- कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योग
- वन आधारित उद्योग
- खनिज आधारित उद्योग
- खाद्य उद्योग
- रसायन आधारित उद्योग
- वस्त्रोद्योग ( खाडी उद्योग सोडून )
- सेवा उद्योग
- ग्रामीण अभियांत्रिकी उद्योग
pmegp loan list of business
PMEGP योजनेअंतर्गत उद्योगांची लिस्ट पहा | येथे क्लिक करा |
pmegp loan
कर्ज किती मिळेल व स्वगुंतवणूक किती करावी लागेल ?
प्रवर्ग | कर्ज रक्कम | स्वतःची गुंतवणूक |
सामान्य प्रवर्ग | 90 % | 10 % |
मागासवर्गीय प्रवर्ग / महिला / अपंग व इतर पात्र लाभार्थी | 95 % | 5 % |
pmegp loan subsidy details
PMEGP कर्ज सब्सिडी किती मिळेल ?
प्रवर्ग | शहरी क्षेत्र | ग्रामीण क्षेत्र |
सामान्य प्रवर्ग | 15 % | 25 % |
मागासवर्गीय प्रवर्ग / महिला / अपंग व इतर पात्र लाभार्थी | 25 % | 30 % |
pmegp loan repayment period
PMEGP कर्ज परतफेड कालावधी किती असतो ?
- कर्ज परतफेड कालावधी हा वेगवेगळ्या प्रकल्पावरती अवलंबून असतो.
- कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा 3 ते 7 वर्षापर्यंत असतो.
pmegp loan mortgage
PMEGP कर्ज घेण्यासाठी तारण काय द्यावे लागते ?
- 10 लाख पर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे तारण लागत नाही.
- 10 लाखाच्या वरील कर्जासाठी मालमत्ता तारण देऊ शकता.
- कर्जाच्या रकमेतून खरेदी केलेल्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तू, मशीनरी ह्या बँकेकडे तारण राहतात.
pmegp loan documents marathi
PMEGP योजनेअंतर्गत कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- प्रकल्प अहवाल ( मान्यताप्राप्त CA )
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- किमान 8 वी पास प्रमाणपत्र
- वीज बिल
- भाडे करार / जमिनीची कागदपत्रे ( स्वतःची असल्यास )
- व्यवसाय परवाना ( शॉप ऍक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन, FSSAI व इतर आवश्यक परवाने )
- PMEGP पोर्टलवरती केलेल्या अर्जाची प्रत
- स्वगुंतवणूक उपलब्ध असल्याचा पुरावा
- आवश्यक असल्यास उद्योजक विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
pmegp loan apply online
अर्ज करण्यासाठी करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत शासन निर्णय (GR) पहा | येथे क्लिक करा |
how to apply pmegp loan
PMEGP योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- PMEGP योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- तिथे तुम्हाला नवीन व्यवसायासाठी अर्ज करण्याचा विकल्प दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती, बँकेची माहिती, आणि इतर गोष्टी भराव्या लागतील.
- फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा अर्जाची पुढील प्रक्रिया पाहू शकता.
- तुमचा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या उद्योग केंद्राकडे पाठविण्यात येईल, तिथे तुमचा अर्ज तपासाला जाईल आणि तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल.
- तुमचा अर्ज मान्य असल्यास, तुम्हाला बँकेकडून कर्जाची मान्यता मिळेल आणि तुम्हाला सब्सिडीची रक्कम दिली जाईल.
- तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आणि नंतर उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येईल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकाल.
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी स्वतः शासन निर्णय चेक करून घ्यायचा आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- अर्ज भरून झाल्यावर एकदा सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर अर्ज सबमीट करा.
Conclusion
या लेखामध्ये आपण PMEGP Yojana 2024 – पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना बद्दल माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती तसेच, अर्ज कसा करायचा हे सर्व आपण यामध्ये सांगितलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Q. PMEGP Yojana 2024 कोण पात्र आहेत ?
PMEGP Yojana 2024 साठी ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण आहे व ज्याचे शिक्षण कमीत कमी 8 वी उत्तीर्ण झाले आहे असे तरुण पात्र आहेत.
Q. PMEGP Yojana Marathi अंतर्गत कोणते व्यवसाय पात्र आहेत ?
PMEGP Yojana Marathi अंतर्गत वर दिलेल्या यादीतील व्यवसाय पात्र आहेत.
Q. PMEGP चा फुल फॉर्म ( Full Form ) काय आहे ?
Prime Minister Employment Generation Programme म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा फुल फॉर्म आहे.
Q. PMEGP कर्ज परतफेड कालावधी किती असतो ?
PMEGP कर्ज परतफेड कालावधी हा वेगवेगळ्या प्रकल्पावरती अवलंबून असतो तसेच कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा 3 ते 7 वर्षापर्यंत असतो.
Q. PMEGP योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते ?
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹ 10 ते ₹ 25 लाखांपर्यंतची कर्जस्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.