Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. दिव्यांग व्यक्तीचा एखादा अवयव नाहीसा झाल्यामुळे, त्यांचे जीवन जगणे खूप कठीण होते. तसेच, त्यांची आर्थिक परिस्थिती पण खूप हलाकीची होते. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक तीन चाकी गाडी 100% अनुदानावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे दिव्यांग व्यक्ती त्यांचा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू शकतील. त्या गाडीमध्ये फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) सुरू करू शकतील व त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. या अनुषंगाने सरकारने ही योजना सुरू केली आहे.

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आज या लेखांमध्ये अर्ज कसा करावा ? , अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, योजनेचा उद्देश काय आहे, तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती व अटी आणि शर्ती काय आहेत यांची सविस्तर माहिती बघणार आहोत लेख काळजीपूर्वक वाचा.

divyang e rickshaw yojana

divyang e rickshaw yojana maharashtra

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा , Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24, Online Application Form, Fill Up Process in Marathi. Divyang Apang Mofat E-Vehicles/ E-Cart Scheme 2023-24 Eligibility Criteria, Terms and Conditions, Required Documents List, and Online Application Form and Registration Process in Marathi.

Divyang mofat riksha yojana in marathi

योजनादिव्यांगांना ई रिक्षा वाटप करणे
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
विभागमहाराष्ट राज्य दिव्यांग कल्याण विभाग
वर्ष२०२३
लाभार्थींराज्यतील दिव्यांग व्यक्ती
उद्देशदिव्यांगांना रोजगार निर्माण करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान ( मोबाईल ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबत दिव्यांग अर्जदाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

Divyang e riksha yojana process in marathi

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे उद्देश काय आहे ?

  • दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी – सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
  • सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.

What is the eligibility criteria of divyang e riksha yojana 2023-24

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेसाठी अटी व शर्ती काय आहेत ?

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% असावे. तसेच, जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यु.डी.आय.डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार दिनांक 01/01/2024 या अहर्ता दिनांक च्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
  • दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार पेक्षा अधिक नसावे.
  • लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे, निवडीचा क्रम ही अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमानेच राहील.
  • अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या साहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेणे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याची प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
  • अर्जदार शासकीय / निमशासकीय (मंडळे) महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

Divyang e rikshaw yojana required documents

दिव्यांग इ रिक्षावाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • अर्जदाराचा जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र ( डोमिसाइल )
  • निवासी पुरावा
  • दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
  • यु. डी. आय. डी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • बँक पासबुक पहिले पानाची झेरॉक्स
  • अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र

How to apply divyang e rikshaw yojana

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • प्रथम वापरकर्त्याची नोंदणी करावी.
  • पोर्टल वरती लॉगिन करावे.
  • अर्ज भरावा आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  • भरलेला फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यावा आणि फॉर्म सबमिट करावा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज ऑनलाईन सबमिट केलेली सबमिशनची पोहोच पावती मिळेल ती पोहोच पावती जपून ठेवावी.

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय ( GR ) वाचावा.

Divyang yojana pdf

शासन निर्णय ( GR ) : Link

divyang e rickshaw online apply

ऑनलाईन अर्ज : Click Here

Divyang yojana self declaration form

स्वयंघोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक : Link

FAQ

Q. दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज कधी सुरु होतील ?

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज ३ डिसेंबर २०२३ रोजी सुरु झाले.

Q. दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे .

Q. दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२४ आहे.

Q. दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचा उद्देश काय आहे ?

दिव्यांगांना रोजगार निर्माण करून देणे हा दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचा उद्देश आहे.

Q.दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे लाभार्थी कोण असतील ?

राज्यतील दिव्यांग व्यक्ती हे दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचे लाभार्थी असतील.

divyang e riksha yojana in marathi

Conclusion:

या लेखामध्ये आपण divyang e rickshaw yojana दिव्यांग अपंग मोफत ई- व्हेईकल वाटप योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती तसेच, अर्ज कसा करायचा हे सर्व आपण यामध्ये सांगितलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

23 thoughts on “Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा”

    • फॉर्म मध्ये बँकेची पूर्ण माहिती भरली गेली आहे, पण चुकून पासबुक अपलोड करण्या ऐवजी.. प्रतिज्ञा पत्र दोनदा अपलोड झाले आहे.. तर काही समस्स्या येऊ शकते काय? आणि जर आली तर फॉर्म मधे दुरुस्ती करता येईल काय.. सविस्तर पणे सांगावे.. धन्यवाद…

      Reply
  1. धन्यवाद सर,
    खूप सोप्या आणि सुटसुटीत लोकांना समजेल अशी माहिती दिली.

    Reply
  2. तुम्ही जी माहिती या वेबाईटवर दिली आहे त्या मुळे माझा खूप फायदा झाला आहे मी तुमचा ऋणी आहे …..

    Reply
  3. 🙏🙏🙏
    धन्यवाद
    🙏🙏🙏

    नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे अंतिम तारीख आली आहे तरीही नवीन फॉर्म ऑनलाईन झालेला समजतं नाही तसेच चेक करता येत नाही

    Reply
    • हो मी पण हेच म्हणतोय अर्जाची तारीख जवळ आली आणि साईट चालत नाही खूप प्रोब्लेम येत आहे

      Reply
  4. साहेब कधी परेत लिस्ट समजेल यादीत नाव आले की नाही

    Reply

Leave a Comment