Lek ladaki yojana – लेक लाडकी योजना 2023 मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना 2023 मध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत समाजातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींच्या जन्मापासून ते वय वर्ष 18 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात १ लाख १ हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे
Lek ladaki yojana Maharashtra 2023
Maharashtra Lek Ladaki Yojana 2023
lek ladki yojana marathi
lek ladki yojana 2024 online apply, lek ladki yojana marathi mahiti, lek ladki yojana maharashtra,lek ladki yojana eligibility Lek ladaki yojana, Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi, Lek Ladki Yojana Maharashtra, Form pdf, How To Apply, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website.
Lek ladaki yojana 2023
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना (Lek ladaki yojana) |
कोणी सुरु केली | राज्य सरकार |
चालू वर्ष | २०२३ |
लाभार्थी | १ एप्रिल २०२३ पासून जन्माला आलेल्या मुली |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
अर्ज करण्याची पद्धत | Online/Ofline |
मिळणारा लाभ | १ लाख १ हजार |
Lek ladaki yojana details in Marathi
लेक लाडकी योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
राज्यामध्ये गरीब कुटुंबातील मुलींना पैशाच्या कमतरतेमुळे पूर्ण शिक्षण मिळत नाही. तसेच, त्यांचे लग्न कमी वयात लावले जाते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकार ने मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुदृढ करण्यासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. सदर योजनेत, पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, मुलगी पहिली मध्ये गेल्यावरती ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावरती ७ हजार रुपये तसेच अकरावीत गेल्यावरती ८ हजार रुपये व लाभार्थी मुलीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार एवढे रक्कम मिळेल.
how to apply lek ladki yojana
लेक लाडकी योजनेचा लाभ कसा मिळणार ?
मुलीचा जन्म झाल्यानंतर | रु 5,000/- |
मुलगी पहिलीत गेल्यावरती | रु 6,000/- |
मुलगी सहावीत गेल्यावरती | रु 7,000/- |
मुलगी अकरावीत गेल्यावरती | रु 8,000/- |
मुलीचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्यावर | रु 75,000/- |
एकूण लाभ | रु 1,01,000/- |
lek ladaki yojana 2023
लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे :
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
Lek Ladaki yojana eligibility criteria
लेक लाडकी योजनेसाठीच्या अटी व शर्ती :
- ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता / पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रक्कम १ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
Maharashtra lek ladaki yojana required documents
लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे. ) याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड ( प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील )
- पालकाचे आधार कार्ड
- बँक पासबुक ( पहिल्या पानाची छायांकित प्रत )
- रेशन कार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत )
- मतदान ओळखपत्र ( शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला )
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला ( बोनाफाईड )
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, ( अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र )
Lek ladaki yojana – लेक लाडकी योजना 2023 अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय ( GR ) वाचावा.
lek ladaki yojana GR
शासन निर्णय ( GR ) : Link
lek ladki yojana form link
अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक : Link
FAQ
Q. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे ?
ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
Q. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा कधी झाली ?
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्र बजेट २०२३-२४ च्या दरम्यान झाली.
Q. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ किती मिळणार आहे ?
मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, मुलगी पहिली मध्ये गेल्यावरती ५ हजार रुपये, सहावीत गेल्यावरती ७ हजार रुपये तसेच अकरावीत गेल्यावरती ८ हजार रुपये व लाभार्थी मुलीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार एवढे रक्कम मिळेल.