Magel Tyala Vihir Yojana – मागेल त्याला विहीर योजना 2023-24

Magel Tyala Vihir Yojana – मागेल त्याला विहीर योजना 2023-24 : नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मनरेगाच्या मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच पूर्वी जी दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटर अंतराची अट होती ती आत्ता रद्द केली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभधारकाची निवड, पात्रता व योजनेबद्दल थोडक्यात माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Magel Tyala Vihir Yojana 2023 – 24

Vihir Anudan Yojana

Magel tyala vihir online application, Magel Tyala Vihir Online Apply, Vihir Yojana Online Application, विहीर नोंदणी अर्ज 2024 Online, Magel Tyala Vihir Yojana 2024 Online Application, Vihir Yojana Documents, Maharashtra Government Vihir Yojana, शेत विहीर योजना, Vihir Anudan Yojana Maharashtra 2024, How To Apply, Key Points, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website.

vihir yojana online maharashtra 2023

योजनेचे नावमागेल त्याला विहीर योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
विभागकृषी विभाग
चालु वर्ष2023
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
उद्देशशेतकरी वर्गाला शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे
मिळणारा लाभ4 लाख रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

vihir anudan yojana details in marathi

मागेल त्याला विहीर योजनेबद्दल थोडक्यात माहिती

शेतकऱ्यांच्या जीवनात पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. पाण्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी अनेक अडचणी भोगाव्या लागतात. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते. परंतु विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते व राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. त्यामुळे पैशांअभावी शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात.

राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्येचा विचार करून राज्य शासनाने राज्यात विहीर अनुदान योजना (मागेल त्याला विहीर योजना) सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे, त्यांच्या आर्थिक व आत्मनिर्भरतेचा विकास करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे व राज्यातील दारिद्र्य संपविणे हा आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, विहीर जिथे खोदायची आहे तेथील लोकेशन व जागा यांचा फोटो, विहीर खोदण्यासाठी लागणारा अंदाजीत खर्च यांची माहिती असणे आवश्यक आहे.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 Selection

मागेल त्याला विहीर योजनेसाठी लाभधारकाची निवड

  • अनुसूचित जाती / जमाती
  • भटक्या विमुक्त जाती / जमाती
  • दारिद्र्यरेषेखालील असलेले लाभार्थी
  • स्त्री कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी / इंदिरा आवास योजना खालील लाभार्थी
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी
  • सीमांत व अल्पभूधारक शेतकरी ( ५ एकर पर्यन्त जमीन असणारे शेतकरी )

Maharashtra Government Vihir Yojana elegibility

मागेल त्याला विहीर योजनेसाठी लाभधारकाची पात्रता

  • लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावी.
  • महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेय जल स्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेज जल स्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर घेता येणार नाही.
  • दोन सिंचन विहिरीतील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run Off Zone तसेच, अनुसूचित जाती / जमाती व दारिद्र्यरेषेखाली कुटुंब यांकरिता लागू राहणार नाही.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
  • लाभधारकाच्या ७/१२ उताऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा ऑनलाईन दाखला असावा.
  • एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

Magel Tyala Vihir Yojana 2024 Online Application

मागेल त्याला विहीर योजनेमधील विहीर कोठे खोदावी

  • दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमाजवळ जेथे मातीचा से. मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ ( झिजलेला ) आढळतो तेथे.
  • नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
  • जमिनीच्या सकल भागात जेथे 30 सें. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मुरूम आढळतो.
  • नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे. परंतु ,सदर उंचावर चोपण किंवा चिकन माती नसावी.
  • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
  • नदी व नाल्यांचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसताना देखील वाळू, रेती व गारगोट्याचा थर दिसून येतो.
  • नदी व नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
  • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

Vihir Yojana Online Application

मागेल त्याला विहीर योजनेमधील विहीर कोठे खोदु नये

  • भूपृष्ठभागावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
  • डोंगराचा कडा व आसपासच्या 150 मीटर अंतरात.
  • मातीचा थर 30 सेमी पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • मुरमाची खोली 5 मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

vihir yojana documents

मागेल त्याला विहीर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • 7/12 व 8 अ ऑनलाईन उतारा
  • जॉबकार्डची प्रत
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्यासचा पंचनामा.
  • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करार पत्र.

Magel Tyala Vihir Online Application

मागेल त्याला विहीर योजनेसाठी अर्ज कसा करावा

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा खाली दिलेल्या लींकवरून अँप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही स्वतः अर्ज करू शकता. तसेच जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या दिवशी सगळ्या कागदपत्रांसोबत अर्ज करू शकता.

sinchan vihir yojana form pdf

अधिकृत शासन निर्णय (GR) पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अँप्लिकेशन लिंकयेथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी फॉर्मयेथे क्लिक करा

विहीर नोंदणी अर्ज 2024 Online

Conclusion

या लेखामध्ये आपण Magel Tyala Vihir Yojana – मागेल त्याला विहीर योजना 2023-24  माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती तसेच, अर्ज कसा करायचा हे सर्व आपण यामध्ये सांगितलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ?

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत ४ लाख रुपये अनुदान दिले जाते.

Q. मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा ?

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. मागेल त्याला विहीर योजनेत किमान किती जमीन हवी ?

लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावी.

Q. मागेल त्याला विहीर योजनेचा उद्देश काय आहे ?

शेतकरी वर्गाला शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.

Q. मागेल त्याला विहीर योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Leave a Comment