PMMVY YOJANA – प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2023 नमस्कार,प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही १ जानेवारी २०१७ रोजी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली असून या योजनेचा नवीन GR प्रसिद्ध झाला आहे.
या माहितीनुसार महिलांना एकूण ११००० रुपये मिळणार आहेत. पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना किंवा पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्यासाठी त्यांना ५००० रुपये मिळणार व दुसरे अपत्य मुलगी असेल तर ६००० रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत.प्रधान मंत्री मातृ वंदना योजना हि अतिशय महत्वपूर्ण योजना आहे.या योजनेसाठीची पात्रता व अर्ज कसा करायचा व उद्दिष्टे इत्यादी सर्व माहिती या लेखांमध्ये सविस्तर दिलेली आहे.
pmmvy yojana in marathi
pradhan mantri matru vandana yojana
pmmvy yojana 2024 in marathi, pmmvy yojana online registration, pmmvy yojana, pmmvy registration, pmmvy scheme apply online, pmmvy application form online, pmmvy scheme benefits, pmmvy scheme details,pmmvy yojana 2024 online apply, How To Apply, Key Points, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website.
pmmvy scheme details
PMMVY प्रधानमंत्री मातृवंदना योजनेविषयी थोडक्यात माहिती
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थी पहिल्यांदा गरोदर असलेली महिला विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्यासाठी रुपये ५००० ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे आपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात ६००० रुपये चा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात DBT द्वारे जमा केला जाईल.
तसेच हि योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे.दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.
pradhan mantri matru vandana yojana First Payment Details
पहिल्या अपत्यासाठी अर्थसहाय्य, टप्पा आणि अट
टप्पा | अट | हप्ता |
पहिला हप्ता | आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी झालेली असावी. | ३०००/- रु |
दुसरा हप्ता | बाळाची जन्म नोंदणी केलेली असावी बालकास लसीच्या तीन मात्रा पूर्ण करणे आवश्यक | २०००/- रु |
pradhan mantri matru vandana yojana Second Payment Details
दुसरे अपत्य मुलगी असेल तर अर्थसहाय्य, टप्पा आणि अट
टप्पा | अट | हप्ता |
पहिला हप्ता | आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी झालेली असावी. | दुसरे अपत्य मुलगी असेल तर तिच्या जन्मा नंतर एकत्रित रु. ६०००/- |
दुसरा हप्ता | बाळाची जन्म नोंदणी केलेली असावी बालकास लसीच्या तीन मात्रा पूर्ण करणे आवश्यक | – |
pmmvy yojana benifit
योजनेची उद्दिष्टे :
- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेलासकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करून त्याांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
- जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा.
- सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
- लाभार्थ्याकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे.
- नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.
Pmmvy Beneficiary eligibility
लाभार्थी पात्रता :
- लाभार्थी महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
- लाभार्थी महिलांकडे इ श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड किंवा ती महिला शेतकरी असेल तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर ज्या मदतनीस असतात अशा सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- महिलांचे वय १९ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला व बीपीएल शिधापत्रिका धारक महिला या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ४० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला याना योजनेचा लाभ घेता येणार आहे..
- आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जण आरोगय योजना अंतर्गत महिला लाभार्थी
pmmvy scheme required documents
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
- चालू असलेला मोबाईल नंबर
- बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
- गरोदरपणाची नोंदणी तारीख प्रसुती पूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात
- माता आणि बाल संरक्षण कार्डावर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत
- गरोदरपणाची नोंदणी केलेल्या आर सी एच पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक
how to fill pmmvy application form
अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे – LINK
pradhan mantri matru vandana yojana
अधिकृत शासन निर्णय (GR) पहा – LINK