Right To Give Up Mahadbt Scholarship Important update 2024 – विद्यार्थी मित्रानो चुकून देखील यावर क्लिक करू नका

Right To Give Up Mahadbt Scholarship Important update 2024 – विद्यार्थी मित्रानो चुकून देखील यावर क्लिक करू नका : राज्यातील विद्यार्थी, शेतकरी व इतर लाभार्थी आपल्या Mahadbt Portal वरती एक नवीन ऑप्शन आलेला आहे. Right To Give Up या पद्धतिचा तो ऑप्शन आहे. या संदर्भात राज्य शासनाकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याबद्दल आपण या लेखामध्ये माहिती बघणार आहोत.

Mahadbt Scholarship Important update 2024

Right To Give Up Mahadbt Scholarship Important update 2024

mahadbt scholarship 2023-24

Right To Give Up बद्दल थोडक्यात माहिती

मा. उपमुख्यमंत्री यांची अध्यक्षतेखाली दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार Give it Up Subsidy या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व 65 योजनांमध्ये तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणाऱ्या सर्व योजनांकरिता Give it Up Subsidy पर्यायाचे बटन / पर्याय महाआयटी मार्फत विकसित करून, संबंधित योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने Give it Up Subsidy पर्यायाचे बटन / पर्याय निवड केल्यानंतर, प्रस्तुत पर्याय निवडेबाबतच्या खात्रीकरिता Pop Up Window मध्ये सूचना येईल. सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईल ओटीपी प्राप्त होऊन, सदर ओटीपी अर्जदारांनी वेबसाईट वरती नोंदवल्यानंतर Give it Up Subsidy प्रक्रिया पूर्ण होईल.

Right To Give Up या ऑप्शन वरती क्लिक केल्यावरती की होईल ?

तुम्ही जर Right To Give Up ह्या ऑप्शन वर click केले तर तुम्हाला शिष्यवृतीचा कोणताही लाभ मिळणार नाही. आणि तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडाल. तुमची शिष्यवृत्ती हि Goverment ला परत जाईल आणि तुम्हाला कोणताही प्रकारे शिष्यावृतीचा लाभ मिळणार नाही. शिष्यवृतीचा लाभ कायमस्वरूपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असली तरच ‘Right To Give Up’ हे बटन दाबावे.

Right To Give Up या ऑप्शन वरती जर चुकून क्लिक झाली तर काय करावे ?

  • सर्वप्रथम तुम्ही संबंधित कॉलेजला सांगून त्यांच्याकडून लेटर हेड वरती तुमची झालेल्या चुकीचे विवरण टाईप करून घ्या.
  • लेटर हेड वरती कॉलेजचा सही शिक्का घ्या.
  • कॉलेज कडून घेतलेले हे लेटर तुम्हाला महाआयटी मुंबई येथे तुम्हाला Physically जाऊन जमा करायचे आहे.
  • या सर्व बाबींवरती प्रक्रिया होऊन तुमची योजना चालू करून दिली जाईल.
  • यामध्ये कोणाला काही अडचण आल्यास Mahadbt Helpline Number वरती संपर्क करा.
अधिक महितीसाठी शासन निर्णय ( GR )येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Conclusion

या लेखामध्ये आपण Right To Give Up Mahadbt Scholarship बद्दल माहिती दिलेली आहे. ज्या विध्यर्थ्यांनी चुकून क्लिक केले आहे त्यांनी लेखामध्ये संगीतलेली प्रोसेस करून घ्या. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Right To Give Up Mahadbt Scholarship Important update 2024

Leave a Comment