Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 – ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 नमस्कार, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी ट्रॅक्टर खरेदीसाठी ८० हजार ते १ लाख २५ हजार पर्यंत अनुदान मिळत होते परंतु शासनाने त्या अनुदानात वाढ करून आता ते पाच लाखापर्यंत मिळणार आहे. कोणत्या यंत्राला किती अनुदान मिळणार आहे हे आज आपण या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत.
Maharashtra Tractor Anudan Yojana
Tractor Anudan Yojana Maharashtra 2023,Krishi Anudan Yojana,tractor anudan yojana maharashtra,agriculture tractor anudan yojana,tractor anudan yojana 2023,Ahmednagar, Akola, Amravati, Ch. Sambhajinagar/Aurangabad, Beed, Nashik, Dharashiv, Parbhani, Bhandara, Buldhana, Chandrapur, Dhule, Gadchiroli, Gondia, Jalgaon, Jalna, Kolhapur, Latur, Nagpur, Nandurbar, Nanded, Pune, Raigad, Ratnagiri, Sangli, Satara, Sindhudurg, Solapur, Thane, Wardha, Washim, Yavatmal, Mumbai.
Tractor Anudan Yojana
Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 – ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 शेतीमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने शासनाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण हा कार्यक्रम राबविला जातो. दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने कृषी अवजारांची सुधारित यादी व त्यावर किती अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे
Tractor anudan yojana details
सुधारित यादीनुसार अनुदान माहिती
लाभार्थी जर SC,ST, अल्पभूधारक शेतकरी
ट्रॅक्टर HP | टक्के | रूपये |
20 HP पर्यंत 2WD | 50% | 2 लाख |
20 HP पर्यंत 4WD | 50% | 2.25 लाख |
20 ते 40HP 2WD | 50% | 2.50लाख |
20 ते 40HP 4WD | 50% | 3 लाख |
40HP पेक्षा मोठा 2WD | 50% | 4.25 लाख |
40HP पेक्षा मोठा 4WD | 50% | 5 लाख |
लाभार्थी जर बहुभूधारक व इतर शेतकरी असेल तर
Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 – ट्रॅक्टर अनुदान योजना 2023
ट्रॅक्टर HP | टक्के | रूपये |
20 HP पर्यंत 2WD | 50% | 1.60 लाख |
20 HP पर्यंत 4WD | 50% | 1.80 लाख |
20 ते 40HP 2WD | 50% | 2 लाख |
20 ते 40HP 4WD | 50% | 2.40 लाख |
40HP पेक्षा मोठा 2WD | 50% | 3.40 लाख |
40HP पेक्षा मोठा 4WD | 50% | 4 लाख |
अल्पभूधारक म्हणजे ५ एकर पेक्षा कमी शेती असलेला शेतकरी व बहुभूधारक म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी
tractor anudan yojana 2023 Terms and conditions
योजनेसाठीच्या अटी :
- ट्रॅक्टर खरेदीसाठी त्याचे कोटेशन असणे आवश्यक.
- ज्याच्या नावावर ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे त्या व्यक्तीचा ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक.
- अनुसूचित जाती-जमातीसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक.
- आधार कार्ड अपडेट करून घेतलेले असणे आवश्यक.
- कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्यांची पूर्वसंमती असणे आवश्यक.
Tractor Anudan Yojana Required Documents
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२ व ८ अ उतारा
- ट्रॅक्टर कोटेशन
- सर्च रिपोर्ट
- जातीचा दाखला (असेल तर)
- पूर्व संमती पत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
Tractor anudan yojana apply online
ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
अर्ज हा शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही जर नवीन फॉर्म भरत असाल तर तुमचे अकाउंट तयार करून घ्यावे लागेल त्या ठिकाणी तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्यानंतर मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करून प्रोफाइल ची 100% माहिती भरून घ्यावी. माहिती भरल्यानंतर कृषी यांत्रिकरण या कॅटेगरी वरती क्लिक करून ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
Krishi Anudan Yojana
योजनेचे अनुदान कसे मिळेल ?
तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला कृषी विभागातून मेसेजद्वारे तुमची निवड झाली आहे असे कळविण्यात येईल. त्यानंतर तुम्ही योग्य ती कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करावी. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कृषी विभागाकडून तुम्हाला एक पूर्वसंमती मिळेल. पूर्वसंमती मिळाल्याशिवाय तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करायचा नाही. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करून त्याचे GST बिल कृषी विभागाच्या पोर्टलवर ते अपलोड करायचे आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याची पडताळणी व प्रोसेस होऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
Tractor Anudan Yojana Maharashtra 2023
टीप : अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय (GR ) वाचावा .
Tractor anudan yojana pdf
शासन निर्णय (GR ) : Link
अर्ज करण्यासाठी लिंक : Apply Online