PM Vishwakarma Yojana – प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2023 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 रोजी झाली. देशातील कारागीर शिल्पकार आणि इतर पात्र नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभ कोणाला मिळणार, योजनेचे फायदे काय आहेत, योजनेचे उद्दिष्टे, तसेच योजनेबद्दल थोडक्यात माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
PM Vishwakarma Yojana in marathi
Pm Vishwakarma Yojana Maharashtra
pm vishwakarma yojana 2024 marathi, pm vishwakarma yojana, pm vishwakarma yojana online apply, vishwakarma yojana, pm vishwakarma yojana registration, pm vishwakarma apply, pm vishwakarma yojana details, How To Apply, Key Points, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website.
योजनेचे नाव | पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
योजना सुरुवात दिनांक | 17 सप्टेंबर 2023 |
चालु वर्ष | 2023 |
लाभार्थी | विश्वकर्मा समाज्याच्या अंतर्गत असलेल्या जाती / जमाती |
उद्देश | विश्वकर्मा समाजातील लोकांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
2023 साठी योजनेचे बजेट | 13 ते 15 हजार करोड |
pm vishwakarma yojana details in marathi
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल थोडक्यात माहिती
PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही भारतातील पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक मदत करण्याची योजना आहे. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही, तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांशी संबंधित लोकांना व्यवसाय उभारण्यास मदत करण्यात येणार आहे. योजनेत लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. या योजनेत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त 5 टक्के व्याजदराने मिळेल. या योजनेत 18 पारंपारिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या 18 ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेत असताना दररोज 500 रुपये विद्यावेतन देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य , 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.
pm vishwakarma yojana
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे
- हस्तकलाकार व अनेक कारागिरांचा कामाचा दर्जा सुधारणे व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करून देणे.
- कारागीर आणि शिल्पकार यांचे कौटुंबिक पारंपारिक कौशल्य जोपासणे.
- रोजगार निर्मिती करणे व नोकऱ्या उपलब्ध करून देणे.
- संबंधित कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे.
- विश्वकर्मांच्या डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.
pm vishwakarma yojana benefits
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे
- व्यवसायासाठी मिळणार 5 टक्के दराने 2 लाख रुपये पर्यंत कर्ज पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये.
- पाच दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम ( 40 तास )
- प्रशिक्षणानंतर एक प्रमाणपत्र मिळणार.
- प्रशिक्षण कालावधीत रुपये 500 चे रोज विद्यावेतन मिळणार.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टूल किट खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार.
- प्रगत कौशल्य प्रशिक्षण मिळणार.
pm vishwakarma yojana eligibility
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला घेता येणार
सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे , सोनार, कुंभार, शिल्पकार, दगड फोडणारे, चर्मकार, गवंडी, टोपल्या / चटया / झाडू बनवणारे कारागीर, बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, फुलांचे हार बनवणारे कारागीर, धोबी, शिंपी, आणि मासेमारीचे जाळे विणणारे.
pm vishwakarma yojana required documents
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जातीचा दाखला
- डोमासाईल
- रेशन कार्ड ( RC नंबर असावा )
- उत्पन्न दाखला
pm vishwakarma yojana pdf
अधिकृत शासन निर्णय (GR) पहा : LINK
pm vishwakarma yojana apply online
अर्ज करण्यासाठी करण्यासाठी लिंक : Link
FAQ
Q. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोक पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी पात्र आहेत.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत काय काय लाभ मिळणार ?
या योजनेअंतर्गत कारागीर व शिल्पकारांना कर्जाबरोबर संबंधित कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण, मार्केटिंग सपोर्ट तसेच डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.
Q. पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही भारतातील पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक मदत करण्याची योजना आहे. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही, तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांशी संबंधित लोकांना व्यवसाय उभारण्यास मदत करण्यात येणार आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील ?
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जातीचा दाखला,डोमासाईल इ कागदपत्रे लागतील.
Q. पीएम विश्वकर्मा योजना कधी सुरु झाली ?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 रोजी झाली.
Q. पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे ?
विश्वकर्मा समाजातील लोकांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून देणे.
Conclusion :
या लेखामध्ये आपण PM Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2023 या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आपण यामध्ये सांगितलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…